डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर मुंबई मनपाने दर्जेदार सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथील सेवा सुविधांची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली, त्या वेळी जाधव बोलत होते. महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात उभारण्यात आलेली फिरती प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे चांगल्या दर्जाची असावीत. याशिवाय अन्नदानाची व्यवस्था ही एकाच मंडपात करण्यात यावी, अशा सूचना जाधव यांनी केल्या.
राज्य शासनाच्या लोकराज्य या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण विषयाशी संबंधित लेख प्रकाशित केले जातील, अशी सूचना जाधव यांनी संबंधित अधिकार्यांना केली. या वेळी मनपा आयुक्त सीताराम कुंटे, नगर विकास सहसचिव सीमा ढमढेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Top Ad
06 November 2012
Home
Unlabelled
महापरिनिर्वाण दिनी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे भास्कर जाधव यांचे निर्देश
महापरिनिर्वाण दिनी दर्जेदार सुविधा पुरवण्याचे भास्कर जाधव यांचे निर्देश
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment