आझाद मैदानाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाची दिशाभूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2012

आझाद मैदानाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाची दिशाभूल


आझाद मैदानातून सायंकाळी सहा वाजल्यानंतर आंदोलनकत्र्यांना बाहेर काढण्यात येते. सहानंतर तुम्ही कुठेही जावा. काहीही करा. आम्हाला न्यायालयाचे आदेश आहेत, असे सांगत पोलिसांकडून आंदोलनकत्र्यांना बाहेर काढले जाते. खरे पाहता न्यायालयाचे आदेश काय आहेत हे तपासून घेण्याचा अमेरिकेत स्थायिक असणारे अनिल गिडवाणी यांनी प्रयत्न केला असता सायंकाळी सहा वाजल्यानंतर तिथे स्वयंपाक करू नये, असे आदेश न्यायालयाचे आहेत. त्यामुळे अनिल गिडवाणी यांनी पोलिसांना याबाबत योग्य ती भूमिका घेण्याची विनंती केली आहे. 
अनिल गिडवाणी हे आय.टी. इंजिनीयर आहेत. अमेरिकेत ते नोकरी करतात. तारीख पे तारीख या प्रकारात नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. वकिलांची साथ न घेता स्वत: त्यांनी जनहित याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयाने याबाबत काहीच निर्णय न घेता त्यांना पुन्हा जनहित याचिका दाखल करायला सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी आझाद मैदानात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सायंकाळी सहानंतर त्यांना मैदानाबाहेर जावे लागणार, असे पोलिसांनी परवानगी काढताना स्पष्ट केले. तेव्हा त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मागितली व त्यानंतर त्यांना खरे आदेश वाचायला मिळावे. आंदोलनकर्ते मैदानात राहतील फक्त स्वयंपाक करू शकणार नाहीत, असे असताना कायदा आदेश न पाहता समाजातील लाखो लोक विश्वास ठेवत सर्व काही ऐकत असतात, असे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS