मुंबईत शेकडो हॉटेल अनधिकृत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2012

मुंबईत शेकडो हॉटेल अनधिकृत


मुंबई : मुंबईत सुमारे 800 ते 900 हॉटेल्स अनधिकृतरित्या सुरू असून अनेक हॉटेल्सवाले विनापरवाना हॉटेल्स चालवत आहेत. यामध्ये अनेक पंचतारांकित हॉटेलांचाही समावेश आहे. यामुळे पालिकेला लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते ही बाब समाजवादी पार्टीचे युवा अध्यक्ष आणि नॅशनल हॉटेल्स इंडियाचे प्रतिनिधी फरहान अबू आझमी यांनी शुक्रवारी पालिका अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन निदर्शनास आणली. या वेळी सपाचे गटनेते रईस शेख हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर मनीषा म्हैसकर यांना पत्रकारांनी विचारले असता इमारतींच्या गच्चीवर हॉटेल व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत अनधिकृत हॉटेल्स मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चालू असतात, मात्र अधिकृत हॉटेलला मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असल्याने या परवानाधारक हॉटेल मालकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते, असे आझमी यांनी सांगितले. अधिकृतरित्या परवानाधारक हॉटेलमालकांना 15 पेक्षा अधिक परवाने द्यावे लागत असल्याने पालिकेकडून एक खिडकी योजना राबवली गेली पाहिजे, अशी मागणी आझमी यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS