मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवताना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील, तावजी गोरुले, सुरेश कोपरकर या नगरसेवकांनी त्यांच्यावर सुरु असलेल्या केसेसची माहिती लपवल्याची तक्रार करूनही कारवाही केली जात नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी केला आहे.
राहुल शेवाळे यांनी १, अशोक पाटील यांनी ५,तावजी गोरुले यांनी १, सुरेश कोपरकर यांनी २ केसेस कोर्टामध्ये चालू असतानाही याची माहिती निवडणूक लढवताना लपविली होती. याबाबतची माहिती माहिती अधिकारात मागवून पारगावकर यांनी शेवाळे, पाटील, गोरुले, कोपरकर यांची तक्रार मुख्यमंत्री, कोंकण विभागीय आयुक्त व निवडणूक अधिकारी यांच्याकडे करून कारवाहीची मागणी केली होती.
राहुल शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक ३४/१० नोंद असून याबाबत कुर्ला कोर्टात केस चालू आहे, अशोक पाटील यांच्यावर गुन्हा क्रमांक १०३/०६, स्था. गु. नो. क्र. ३६५/०७,१९४८/०८, व १०४/०९ अन्टोप हिल येथे दाखल असून त्याची त्यांच्यावर केस चालू आहे.सुरेश कोपरकर यांच्यावर गुन्हा क्रमांक १७८/९२,३१८/९५ नोंद असून याबाबत मुलुंड कोर्टामध्ये केस चालू आहे, तर तावजी गोरुले यांच्यावर गुन्हा क्रमांक ६८/२०१० नोंद असून त्यांच्याव विक्रोळी कोर्टामध्ये केस चालू आहे.
या सर्वांवर गुन्हे दाखल असताना कोर्टामध्ये केसेस सुरु असतानाही या सर्वांनी निवडणूक लढवताना भरण्यात येणाऱ्या शपथ पत्रामध्ये या सर्व गुन्ह्यांची व चालू असलेल्या केसेसची माहिती लपवली आहे.यामुळे या सर्वांनी निवडणूक आयोग, मतदार व मुंबई महानगर पालिका यांची फसवणूक केली असल्याने या सर्वांवर कारवाही करावी अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment