मुंबई- इंदू मिलच्या जागेसंदर्भात चालढकल करून सरकार आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळत आहे. सरकारने या जागेला हस्तांतराला तत्त्वतः मान्यता दिली असताना घोडे अडले कुठे, असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे (डेमोक्रॅटिक) नेते टी. एम. कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. इंदू मिलचा प्रश्न मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासारखा करू नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दलितांनी रक्त सांडले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. "रिडल्स'प्रकरणीही सरकार गंभीर नव्हते. दलितांनी आंदोलन केल्याशिवाय सकारात्मक भूमिका घ्यायची नाही, असे सरकारचे धोरण असल्यास रिपब्लिकन जनता कशाचीही पर्वा न करता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आपला पक्ष सर्वांना सोबत घेऊन आंदोलन करील, असेही त्यांनी सांगितले. मनसे नेते राज ठाकरे इंदू मिलच्या प्रश्नावर तेढ निर्माण करीत आहेत, असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
सरकारने पाण्यावरून राजकारण करू नये; मराठवाड्याच्या जनतेच्या भावनेशी खेळू नये. जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी कांबळे यांनी केली.
Post Top Ad
28 November 2012
Home
Unlabelled
'इंदू मिलचा प्रश्न नामांतरासारखा करू नये' - टी. एम. कांबळे
'इंदू मिलचा प्रश्न नामांतरासारखा करू नये' - टी. एम. कांबळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment