पालिकेच्या कामकाजाचे होणार चित्रीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2012

पालिकेच्या कामकाजाचे होणार चित्रीकरण


मुंबई महापालिकेच्या दीडशे वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या सभेपासून आजपर्यंत इतिवृत्त लिहिले जाते. ही प्रथा कायम ठेवणे गरजेचे असले, तरी बदलत्या काळानुसार महासभेच्या कामकाजाचे चित्रीकरण करणे आवश्‍यक आहे. हे चित्रीकरण भविष्यात मोलाचा ठेवा ठरू शकेल, म्हणून ही ठरावाची सूचना मांडण्यात आली, असे सभागृह नेते शैलेश फणसे यांनी सांगितले. 

मुंबई महापालिका कायद्यात चित्रीकरणाची परवानगी नसल्याने कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचे चित्रीकरण होत असल्याने महापालिकेतील कामकाजाचे चित्रीकरण होण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. महापालिकेतील अनेक नेत्यांनी केलेली महत्त्वाची भाषणे आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे नव्या नगरसेवकांना फक्त ऐकीव माहितीवर समाधान मानावे लागते. कामकाजाच्या चित्रीकरणाची पद्धत सुरू झाल्यास पुढील पिढ्यांना हा ठेवा मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले. 

महासभेत अनेकदा नगरसेवक धाडसी घोषणा आणि मागण्या करतात. त्यामुळे काही नगरसेवक अडचणीत आले आहेत, पण त्या वेळी "आपण असे बोललोच नाही', असा दावा केला जातो. चित्रीकरण सुरू झाल्यास नगरसेवकांना महासभेत बोलताना विचार करावा लागेल.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS