अभियंत्यावरील कारवाईमुळे मुख्य अभियंत्यांची बदली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2012

अभियंत्यावरील कारवाईमुळे मुख्य अभियंत्यांची बदली


मुंबई : पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावरील खड्डय़ावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर खड्डे बुजविण्यात कामचुकार करणार्‍या ठेकेदारांना तसेच पालिका अभियंत्यांवर दंडनीय कारवाई करणार्‍या मुख्य अभियंता (प्रभारी) यांनाच हटवून त्यांची बदली करण्यात आली आहे. 

मुंबईतील रस्त्यावरून नेहमीच राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या घटना घडल्या आहेत. यावर 'फोटो काढा खड्डे बुजवा' संकल्पना आणून पालिकेने त्वरित खड्डे बुजविण्याचे निर्देश त्या-त्या विभागातील अभियंत्यांना दिले होते. मात्र अनेक खड्डे बुजवले न गेल्याने रस्त्याच्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा प्रभारी भार सांभळणार्‍या अग्रवाल यांनी अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांच्या सूचनेनुसार या कामचुकार अभियंत्यांवर तसेच कंत्राटदारांवर कारवाई केली होती. त्या वेळी या कारवाईत अभियंता संघटनेकडून विरोधही झाला होता. मनपा अभियंते तसेच ठेकेदारांवरील दंडाबाबत पालिका प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसतानाच कामचुकार अभियंत्यांवर कारवाई करणार्‍या अग्रवाल यांना प्रभारी पदावरून दूर करीत त्यांची बदली पश्चिम उपनगराच्या मुख्य अभियंता अधिकारी या पदावर केली. त्यांच्या जागी डी. आर. दीक्षित यांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यांना रस्ते विभागाच्या कामाच्या कोणताही अनुभव नसून ते यापूर्वी विकास नियोजन विभागात कार्यरत होते. अभियंता संघटनेच्या दबावामुळेच ही बदली झाल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS