माझ्या पतीच्या खुन्यांना शिक्षा कधी देणार? - रजनी पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2012

माझ्या पतीच्या खुन्यांना शिक्षा कधी देणार? - रजनी पाटील

मुंबई : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांचा खून करण्यात आला असून त्याचे 140 पुरावे तपासात समोर आले आहेत. असे असूनसुद्धा गेल्या 7 वर्षापासून माझ्या पतीचे खुनी आजही मोकाट आहेत. त्यांच्यावर कठोर व त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी रजनी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार संघ येथे केली. 

21 सप्टेंबर 2005 रोजी प्रा. व्ही. जी पाटील यांचा खून झाला. या खुनामागे डॉ. उल्हास पाटील, डॉ. जी. एन. पाटील, माजी आमदार रमेश चौधरी यांचा हात असल्याचे 140 पुरावे तपासात समोर आले आहेत. हे पुरावे कोर्टात सादर करावेत, अशी मी केलेली विनंती जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने मान्य केली होती व तशी ऑर्डरही केली होती. त्याविरुद्ध सी.बी.आय.ने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका 20 ऑक्टोबर 2012 रोजी उच्च न्यायालयाने फेटाळली. त्याविरुद्ध सी.बी.आय.ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबर 12 रोजी फेटाळली व औरंगाबाद न्यायालयाच्या निकाल कायम ठेवला, असे रजनी पाटील यांनी या वेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS