नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील दारिद्रय़रेषेखालील जनतेला एक महिना आधीच नववर्षाची भेट दिली आहे. गरीबांना मिळणार्या अनुदानातील गळती थांबवून ते थेट लाभार्थीच्या पदरी पडण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजनेची अंशत: सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. योजनेच्या या पहिल्या टप्प्यात तब्बल दहा लाख लाभार्थीच्या थेट खात्यामध्ये आता अनुदान जमा होणार आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे एलपीजी आणि रॉकेलच्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे. काँग्रेसने या योजनेला 'आप का पैसा, आप के हाथ' असे नाव दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही योजना लागू केली जाणार आहे.
Post Top Ad
28 November 2012
Home
Unlabelled
1 जानेवारीपासून अनुदान लाभार्थीच्या खात्यावर
1 जानेवारीपासून अनुदान लाभार्थीच्या खात्यावर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment