..तर मंत्रालयावर धडक देऊ - सीरिल डिसोझा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2012

..तर मंत्रालयावर धडक देऊ - सीरिल डिसोझा


मुंबई : मालवणी परिसरात अनधिकृतपणे आणि विनापरवाने सुरू असलेल्या खाजगी रुग्णालये आणि नर्सिग होम्सविरोधात रविवारी अपक्ष नगरसेवक सीरिल डिसोझा यांनी नागरिकांसहित भव्य मोर्चा काढला. रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या या रुग्णालयांवर आणि नर्सिग होम्सवर कारवाई करण्याचे पत्र आरोग्य मंत्री, मुंबईचे महापौर, आयुक्त आणि इतर संबंधितांना पाठवण्यात आले आहे. एक महिन्याच्या अवधीत या रुग्णालये आणि नर्सिग होम्सवर कारवाई करण्यात आली नाही, तर मंत्रालयावर नागरिकांसहित धडक देऊ, असा इशारा डिसोझा यांनी दिला. एवढेच नव्हे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या घरासमोरच त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करू, असे डिसोझा म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS