ओबीसी समाजाचा असल्यामुळेच आपल्याला टार्गेट केले जाते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2012

ओबीसी समाजाचा असल्यामुळेच आपल्याला टार्गेट केले जाते


नाशिक : ओबीसी संवर्गातील माळी समाजाचा असल्यामुळेच आपल्याला टार्गेट केले जातेय, असा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटनमंत्री व नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला. 
महात्मा फुले समाज विकास संस्थेतर्फे आयोजित माळी समाज अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाजीराव तिडके होते. भुजबळ पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर आरोप केले जात आहेत. परंतु त्यामध्ये काहीही तथ्य न आढळल्याने आता विरोधकांनी आपण ओबीसी असल्याचा फायदा उठवून आरोप करण्यास सुरुवात केली आहे. असे सांगून त्यांनी समाजातील सर्व सर्व पोटजातींनी एकत्र येऊन समाजहितासाठी ऐक्य साधावे, असे आवाहन केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS