इंदू मिल हस्तांतरात सोनियांचा खोडा: प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2012

इंदू मिल हस्तांतरात सोनियांचा खोडा: प्रकाश आंबेडकर



मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी साडेबारा एकर जमीन हस्तांतरित करण्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचाच विरोध असल्याने त्याच या हस्तांतरात खोडा घालत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

सोनिया गांधी यांच्या वेळकाढू धोरणामुळे इंदू मिलची जमीन अद्याप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळू शकलेली नाही, असे आंबेडकर म्हणाले. राष्‍ट्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय मिलच्या साडेबारा एकर जमिनीपोटी राज्य सरकारकडे 5 हजार कोटी रुपयांची मागणी करत आहे. ही मागणी अव्वाच्या सव्वा असून या जमिनीवर सरकारची मालकी असताना वस्त्रोद्योग मंत्रालय त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच ही अवास्तव मागणी पूर्ण करण्याची गरज नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जमीन मागण्यात आल्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालय अडवणूक करत असल्याचा आरोपही  आंबेडकर यांनी केला.  केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असताना तमाम दलित समाजाकडून होत असलेली ही मागणी पूर्ण करणे हेच केंद्राचे काम आहे, मात्र सोनिया गांधी यांचा विरोध असल्याने केंद्र सरकारला जमीन देता येत नाही हे थेट सांगता येत नसल्याने सरळ नकार देण्याएवजी जमीन हस्तांतर करण्यात अडचणी उभ्या करण्यात  येत असल्याचे ते म्हणाले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS