| मुंबई : पत्रकारांवर पितृतुल्य प्रेम करणारा, पत्रकार संघाच्या कार्याची आस्थेने चौकशी करणारा आणि पत्रकार संघावर बेतलेल्या कोणत्याही संकटप्रसंगी धावून येणारा, असा पत्रकारांच्या घरातला माणूस आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दात मुंबई मराठी पत्रकार संघाचे ट्रस्टी सुकृत खांडेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मुंबई मराठी संघाच्या पत्रकार भवनात बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कार्यवाह विजयकुमार बांदल यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य तसेच अरविंद कुळकर्णी, वंदना साळसकर-साखळे, पंढरीनाथ सावंत, शशिकांत सांडभोर, योगेश त्रिवेदी, प्रभाकर राणे आणि सदानंद खोपकर या पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले म्हणाले, मुंबई मराठी पत्रकार संघावरील प्रेमापोटी वेळोवेळी भेटी देऊ न कार्याची आस्थेने चौकशी करणारा पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारणारा, असा राजकारणी पत्रकार आजपर्यंत पाहिला नाही. पत्रकारांवर नितांत प्रेम करणारा बाळासाहेबांसारखा नेता महाराष्ट्रात झाला नाही, असे सांगून अजय वैद्य म्हणाले की काही ठरावीक पत्रकारांनी मात्र यांच्या मराठी माणसावरील प्रेम आणि हिंदुत्व निष्ठा याबद्दल गैरसमज पसरवून त्यांच्यावर अन्यायच केला. पत्रकारितेचा गेल्या प्रदीर्घ काळातील इतिहास याची साक्ष आहे. अरविंद कुळकर्णी म्हणाले पत्रकारांच्या कुटुंबातला; परंतु पत्रकारांनीच सातत्याने ज्याची प्रतिमा मलिन केली, त्यांचा बळी घेतला, अशा प्रभावी नेत्याचे नाव बाळासाहेब ठाकरे असे आहे. हुकूमशहा म्हणून पत्रकारांनीच त्यांची निर्भत्सना केली; परंतु मराठी माणसाचे प्रश्न सनदशीर मार्गाने सोडवणारा, असा लोकहितवादी नेता आजवर महाराष्ट्रात झाला नाही. |
Post Top Ad
23 November 2012
Home
Unlabelled
पत्रकारांच्या घरातला माणूस आपल्यातून निघून गेला
पत्रकारांच्या घरातला माणूस आपल्यातून निघून गेला
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment