देशात सरकारी विभागांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडक र यांनी व्यक्त केले. रविवारी भिवंडीत भारिप कार्यकत्र्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले की, ज्या विभागात पोलीस कारवाई केली जाते त्या विभागांचे खाजगीकरण करणे चुकीचे आहे. भिवंडीतील टोरँट पॉवरचे झालेले खाजगीकरण हटवणे शक्य आहे, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले. भिवंडी शहरातील पॉवरलूम उद्योग, विजेची समस्या, सट्टेबाजीमुळे कारखानदारी बंद पडत असल्याने बेकारी वाढत आहे. या गहन समस्येवरही या वेळी चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन पक्ष केंद्र सरकारला पाठिंबा देण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून स्वत:ची पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
Post Top Ad
13 November 2012
Home
Unlabelled
सरकारी विभागांचे खाजगीकरण नको - आंबेडकर
सरकारी विभागांचे खाजगीकरण नको - आंबेडकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment