पालिकेची मार्केट बनली गोदामे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2012

पालिकेची मार्केट बनली गोदामे


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 180 मार्केट्स ताब्यात घेतली असूनही या मार्केटचा वापर न केल्यामुळे या सर्व मंडया अतिशय खराब अवस्थेत असून यातील अनेक मार्केटचे गोडाऊन झालेले आहे. या खात्याचे प्रमुख असलेल्या पालिका अतिरिक्त आयुक्तांना याबाबत इच्छाशक्ती नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप माजी महापौर नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांनी सोमवारी 66 अन्वये उपस्थित नोटिशीद्वारे केला.

मुंबईत विकासकांकडून मुंबईच्या वापरासाठी बांधलेल्या आणि नंतर पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या इमारतींची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. या इमारती जनतेसाठी वापरात आणण्यासाठी प्रशासन दिरंगाई करीत असल्याने या सुविधा उपलब्ध करून देताना पालिकेला त्यावर पुन्हा खर्च करावा लागणार आहे. काही विभागांत पालिकेची एकही मंडई नसतानाही पालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारती मंडईसाठी का वापरत नाहीत, यामागची कारणे काय? असा सवाल शुभा राऊळ यांनी केला. 

यावरमुंबईत विकासकांकडून बांधलेल्या 180 पैकी 147 इमारती पालिकेकडे हस्तांतरीत केल्या आहेत. यामध्ये मार्केटसह ग्रंथालये, दवाखाने इत्यादींचाही समावेश असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणल्यावर प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी ज्या वास्तू तयार आहेत त्या कशा वापरता येतील त्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS