इस्कॉनकडून तांदळाची बेकायदेशीर साठवणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2012

इस्कॉनकडून तांदळाची बेकायदेशीर साठवणूक


मनसेची कार्वाहीची मागणी 
मुंबई : शालेय पोषण आहार योजनेमधील तांदूळ इस्कॉन फूड फाऊंडेशन रिलीफ या संस्थेने बेकायदेशीररीत्या साठवणूक करून शासनाची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा संस्थेस मुंबई महानगरपालिकेमध्ये शालेय पोषण आहार पुरवठय़ाचे काम देण्यात येऊ नये आणि त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्राद्वारे केली आहे.

नवी मुंबईतील कोल्डस्टोरेज आणि गोदामामध्ये शालेय पोषण आहारातील धान्याचा साठा केला जात असल्यीच माहिती मुंबईच्या शिधावाटपक नियंत्रक विभागाला मिळाली होती.त्याअनुषंगाने शुक्रवारी रात्री नेरूळ आणि कोपरखैरणे येथील कोल्डस्टोरेज आणि गोदामावर धाड टाकण्यात आली. नेरूळ येथील गोदामात तांदळाच्या 15 हजार 270 गोण्या आणि कोपरखैरणे येथील गोदामात 3 हजार 206 तांदळाच्या गोण्या आढळून आल्या होत्या. हा साठा इस्कॉन फूड फाऊंडेशन रिलीफ या संस्थेच्या मालकीचा असल्याचे नंतर उघडकीस आले होते.

शालेय पोषण आहार योजनेमधील धान्याची साठवणूक करून तो नंतर बाजारात विकून बक्कळ पैसा कमवावा, अशी इस्कॉनची मोडस ऑपरेंडी असल्याचे मनसेचे पालितील गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले. महिला बचत गटाकडून खिचडी दर्जेदार नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र इस्कॉनच्या या घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर अशा संस्थेस कंत्राट देण्यात येऊ नये आणि काळ्या यादीत संस्थेला टाकण्यात यावे, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS