12 डिसेंबरपासून पत्रकारांचे आमरण उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

12 डिसेंबरपासून पत्रकारांचे आमरण उपोषण

Share This
मुंबई : पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा बनवण्यास सरकारची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर 12 डिसेंबरपासून 10 पत्रकार आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी सोमवारी प्रेसक्लब येथे दिली. 

पत्रकार कोणाला म्हणायचे व आपल्या कार्यकत्र्यांचे काय? या दोन गोष्टीमुळे हा कायदा होत नसावा असे चित्र स्पष्ट होत आहे, असे सांगत देशमुख म्हणाले, फेसबुकवर शिवसेनाप्रमुखांच्या वक्तव्यावर पोलिसांनी जी कारवाई केली व सरकारने त्याला जे खतपाणी घातले तशी भूमिका या कायद्याबाबत सरकार का घेत नाही, असे देशमुख म्हणाले.

1985 नंतर गेल्या 27 वर्षात राज्यात 12 पत्रकारांचे खून झाले, 12 वर्षात 42 दैनिक व वाहिन्यांच्या कार्यालयांवर हल्ले झाले, 2002 नंतर 763 पत्रकारांवर हल्ले झाले, सर्वाधिक घटना रायगडमध्ये, 90 टक्के प्रमाण राजकीय पुढार्‍यांचे, हल्लेखोरांवर कारवाई नाही, माहिती अधिकारात खोटी माहिती, हे सर्व किती दिवस सहन करायचे? असा सवाल किरण नाईक यांनी या वेळी केला. 

6 जानेवारी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास राजकीय व्यक्तीला बोलावयाचे नाही, असा निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार दिनाला पत्रकार हक्क संरक्षण दिन या नावाने बोलले जावे. या व इतर मागण्या घेऊन प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या वेळी पत्रकारांची अपुरी संख्या असल्यामुळे परिषदेत चर्चा सुरू होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages