घरांसाठी आदिवासींचे उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घरांसाठी आदिवासींचे उपोषण

Share This

मुंबई : पक्ष्यांना या जगात झाडावर घर बांधण्यास अधिकार आहे, मात्र आदिवासींना त्यांच्या जमिनीवरच घर बांधायला परवानगी नाही, असा हा न्याय जागतिक मानवाधिकार दिनाच्या पाश्र्वभूमीवर योग्य आहे का? असा सवाल करत राज्यातील आदिवासींनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे.

'श्रमिक मुक्ती आंदोलन' या संघटनेच्या वतीने मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून हे उपोषण सुरू करण्यात आले. या वेळी विठ्ठल लाड म्हणाले, आदिवासींना सरकार घरे देऊ शकत नाही तर आहे ती घरे बिल्डरांच्या घशात घालू नका. त्यांच्या जमिनी त्यांना परत द्या, म्हणजे आपोआपच त्यांचे त्यांच्या जमिनीवरील घर त्यांना परत मिळेल. या समाजाला रेशनिंग व्यवस्था, इंदिरा आवास योजना, वीज, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, नोकर्‍यांचा प्रश्न, आदी प्रश्न सरकारने गांभीर्याने सोडवावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याचबरोबर गिरणी कामगार, सुरक्षा रक्षक, बेरोजगार, शिक्षक, आदी क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न मानवाधिकार दिनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने सोडवावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages