| मुंबई : मुंबईच्या सुरक्षेचा कणा असलेल्या मुंबई अग्निशमन दल या अतिमहत्त्वाच्या खात्याचा कारभार पेलण्यासाठी असमर्थ व अपयशी ठरलेले प्रमुख अग्निशमन अधिकारी सुहास जोशी यांना आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी निदरेषत्व सिद्ध होईपर्यंत निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांनी आतापर्यंत एनओसी दिलेल्या सर्व इमारतींची विशेष समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनाप्रणीत मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेने केली आहे. या विषयाकरिता तत्काळ सभा आयोजित न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही महापौरांनी पत्राद्वारे दिला आहे. शरद राववगळता इतर युनियन सभासदांसाठी सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी देऊनही अंमलबजावणी झालेली नाही. पर्यायाने त्यातून मिळणारी थकबाकी अग्निशमन जवानांना मिळालेली नाही. रजेचे मेमो, प्रवास भत्ता किंवा रजेपोटी मिळणारी रोख रक्कम रजेवरून हजर झाल्यानंतर चार-पाच महिन्यांनंतरही मिळत नाही. यावर खातेप्रमुखांनी लक्ष देणे आवश्यक आहे; परंतु या खुर्चीत येणारा प्रत्येक अधिकारी आपल्या कार्यकाळात जास्तीत जास्त इमारतींना एनओसी देण्याच्या प्रयत्नात असल्याने कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप संघटनेने केला आहे. सुहास जोशी यांच्यावर आदर्श इमारतीला बेकायदा एनओसी दिल्याचा ठपका आहे. त्यांची पूर्ण चौकशी झाल्यास मुंबईत अशा अनेक 'आदर्श' इमारती सापडतील, असे संघटनेने म्हटले आहे. |
Home
Unlabelled
प्रमुख अग्निशमन अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी
प्रमुख अग्निशमन अधिकार्यांना निलंबित करण्याची मागणी
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment