मुंबई : शतकापेक्षा अधिक काळ लढा दिल्यानंतर भारत 1947 साली स्वतंत्र झाला, मात्र स्वातंर्त्यप्राप्तीनंतरही 1962, 1965 व 1971 साली देशाच्या एकतेला व अखंडतेला शत्रू राष्ट्रांकडून आव्हान केले गेले. भारताच्या सशस्त्र सेना दलांनी ही आक्रमणे यशस्वीरीत्या परतावून लावली व देशाची एकता व भौगोलिक अखंडता अबाधित राखली. 1999 साली कारगिल युद्धात देखील देशाच्या सैन्य दलाने शत्रू राष्ट्राला धडा शिकवला. स्वातंर्त्योत्तर काळातील हा इतिहास युवकांना व विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी स्वातंर्त्यपूर्व लढय़ाप्रमाणे स्वातंर्त्योत्तर इतिहासदेखील युवक व विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आवाहन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी येथे केले. त्यामुळे स्वातंर्त्य टिकवण्यासाठी निरंतर जागृत राहण्याचा संदेश युवकांपर्यंत पोहोचले, असे मत त्यांनी व्यक्त केले. सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ सोमवारी राज्यपालांच्या हस्ते राज भवन येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
Home
Unlabelled
युवा पिढीला स्वातंर्त्योत्तर इतिहास शिकवण्याची गरज - के. शंकरनारायणन
युवा पिढीला स्वातंर्त्योत्तर इतिहास शिकवण्याची गरज - के. शंकरनारायणन
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment