मोदी यांनी दलित अल्पसंख्यांक यांची काळजी घ्यावी - मनोज संसारे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2012

मोदी यांनी दलित अल्पसंख्यांक यांची काळजी घ्यावी - मनोज संसारे


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिका सभागृहामध्ये गुजरात मध्ये भाजपचा विजय झाल्याने अभिनंदन करण्याचा प्रस्ताव आला असता मोदी यांचे अभिनंदन करून मोदी यांनी दलित आदिवासी व अल्पसंख्याक समाजाची काळजी घ्यावी असे आवाहन अपक्षांचे गटनेते मनोज संसारे यांनी केले.

यावेळी मोदी हे विकासाच्या नावावर नव्हे तर दंगली घडवून लोकांमध्ये दहशत निर्माण करून जिकून आले असल्याचे संसारे यांनी सांगितले.   पालिका सभागृह नेते यशोधर फणसे यांनी फक्त गुजरातच्या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव आणल्याने सभागृह नेते हे पद कोणत्या पक्षाचे नसून पालिका सभागृहातील नेत्याचे पद आहे यामुळे फणसे यांनी भेदभाव न करता हिमाचल मध्ये कॉंग्रेस ने विजय मिळवल्याबद्दल काँग्रेसचे सुधा अभिनदन करायला हवे होते असे संसारे म्हणाले. 

यावेळी विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी हिमाचल निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असल्याने काँग्रेस व सोनिया गांधी यांचे सुद्धा अभिनंदन करावे अशी मागणी केली. भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांनी मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती देवून भाजपने सर्वात जास्त हरिजन, दलित लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणले असल्याचे सांगितले. यावर मनोज संसारे यांनी हरिजन हा शब्द असविधानिक असल्याने पटेल यांनी मागे घ्यावा अशी मागणी केली. महापौर सुनील प्रभू यांनी हा शब्ध मागे घेण्याचे निर्देश दिल्यावर पटेल यांना हरिजन हा असंविधानिक शब्द मागे घ्यावा लागला. यावेळी मनसेचे गट नेते दिलीप लांडे यांनी मोडी आणि काँग्रेसचे अभिनंदन करत येणाऱ्या काळात मनसे आणि भाजपा एकत्र येवून निवडणूक लढल्यास व निवडणूक जिंकल्यास सभागृह नेत्यांनी असा ठराव आणायला विसरू नये असे सांगत २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपा व मनसे एकत्र येवून निवडणूक लढवेल याचे संकेत दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS