बॅँकांच्या संपाने व्यवहार ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2012

बॅँकांच्या संपाने व्यवहार ठप्प

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांनी बँकिंग सुधारणा विधेयकाविरुद्ध देशव्यापी संप पुकारल्याने गुरुवारी दिवसभर राष्ट्रीयीकृत बँकांतील कामकाज ठप्प झाले. बँकिंग सुधारणा विधेयकाला मंगळवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज, बँक एम्प्लॉईज 

फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन्स आणि नॅशनल युनियन ऑफ बँक एम्प्लॉईज या चार प्रमुख संघटनांचा या संपात सहभाग आहे. या विधेयकामुळे बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणूक व इतर खाजगी बँका स्थापण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांच्या गुंतवणुकीमध्ये खाजगी बँकांच्या गुंतवणुकीची मर्यादा एक टक्क्याहून दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आणि या विधेयकाचा सरकारी बँकांनी विरोध करीत गुरुवारी संप पुकारला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS