सभागृहामध्ये अनुपस्थित राहण्याची शेवाळे यांच्यावर नामुष्की - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सभागृहामध्ये अनुपस्थित राहण्याची शेवाळे यांच्यावर नामुष्की

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
शिवाजी पार्क मैदानाचे नाव शिवतीर्थ करावे अशी मागणी करणारे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यावर आज सभागृहामध्ये अनुपस्थित राहण्याची नामुष्की ओढवली. यामुळे शेवाळे यांनी केलेल्या शिवतीर्थच्या प्रस्तावावर आज पालिकेमध्ये चर्चा होऊ शकली नाही.

राहुल शेवाळे यांनी शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ असे करावे अशी सूचना ठरावाद्वारे पालिकेकडे केली होती. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी पार्क मधून काढून टाकणार अशी माहिती मिळताच सर्वच विरोधी पक्षांनी या नामांतराला विरोध केला होता. विरोधी पक्षांचा विरोध पाहून राहुल शेवाळे यांना घुमजाव करत आपण शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार झाले त्या चौथरयाला शिवतीर्थ असे द्यावे असा सूचना ठराव दाखल केला आहे असे सांगावे लागले होते.

हा विषय सभागृहामध्ये येईल त्यावेळी शेवाळे अनुपस्थित राहिले किवा त्यांनी लेखी लिहून हा ठराव मागे घेतला तर या विषयावर चर्चा होणार नाही असे पालिकेतील जाणकारांनी सांगितले होते. जाणकारांनी सांगितल्या प्रमाणे आज मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहामध्ये या विषयावर चर्चा होणार असताना शेवाळे हे अनुपस्तिथ राहील्याने आज या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. 
शिवतीर्थ चा मुद्दा शेवाळे यांच्या अंगलट आला असून विरोधकांचा विरोध व भाजपच्या तळ्यात मळ्यातील भूमिकेमुळे शेवाळे यांचे हसे झाले आहे. शेवाळे यांनी जी वस्तू अजून उभीच राहिली नाही त्याचे नामांतर करण्याचा प्रस्ताव आणणे म्हणजे बाल जन्माला यायच्या आधीच त्याचे नामकरण केल्या सारखा प्रकार असल्याने शेवाळे यांना आज शिवतीर्थ च्या मुद्यावरून पालिका सभागृहामध्ये अनुपस्तिथ राहावे लागले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages