महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची विशेष दक्षता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांची विशेष दक्षता

Share This
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ५६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणार्‍या अनुयायांच्या सुरक्षेकरिता मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ५ व ६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क परिसरात प्रचंड जनसमुदाय येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची विशेष दक्षता घेत पोलिसांनी सुरक्षेची सर्वतोपरी तयारी केली आहे.

५ व ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर स्थानक परिसरांत देशाच्या कानाकोपर्‍यातून बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात.यावेळी समाजकंटकांकरवी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठिकठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवले आहेत. असे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. 

३ पोलीस उपायुक्त, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, १३ पोलीस निरीक्षक, १७ पोलीस अधिकारी, ७६३ पोलीस कर्मचारी, ७० महिला पोलीस कर्मचारी, ४०० पोलीस कर्मचार्‍यांचा अतिरिक्त ताफा, एसआरपीएफचे ५ प्लाटून, आरएएफची एक कंपनी, दंगल नियंत्रण पथक, बीडीडीएसचे पथक तैनात असेल. तर संपूर्ण मुंबई मध्ये तब्बल १५ हजार पोलिसांना तैनात करण्यात आले असल्याचे मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या मदतीला समता सैनिक दलाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे. चैत्यभूमीत जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता यावे याकरिता अनुयायांना व्यवस्थित रांगेने पाठविण्याचे काम समता सैनिक दलाचे जवान करणार आहेत.

चैत्यभूमीकडे येताना भीमसैनिकांना कोणतीही अडचण होऊ नये याकरिता वाहतूक पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.
पार्किंग नाही ५ डिसेंबरच्या सायंकाळी ८ वाजल्यापासून ७ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजेपर्यंत खालील रस्त्यांवर सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आली आहेत. एस.व्ही. रोड, रानडे रोड, एन.सी.केळकर रोड, केळुस्कर रोड (दक्षिण व उत्तर), एल.जे. रोड, गोखले रोड (दक्षिण व उत्तर), टी.एच.कटारिया रोड, टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस.के.बोले मार्ग.
पार्किंगसाठी रस्तेसेनापती बापट मार्ग, पाच गार्डन (माटुंगा)
एक दिशा मार्ग- एस.के.बोले मार्ग : सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हनुमान मंदिरापर्यंत एक दिशा.
- भवानी शंकर रोड : कबुतरखान्यापासून गोखले रोड जंक्शन पर्यंत.
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : हिंदुजा रुग्णालयापासून पांडुरंग नाईक मार्ग जंक्शनपर्यंत.
- टी.एच.कटारिया मार्

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages