१ कोटी मोबाईलधारकांना बसणार फटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2012

१ कोटी मोबाईलधारकांना बसणार फटका

पुढील महिन्यापासून टाटा, व्हिडीओकॉन आणि युनिनॉरसारख्या तीन बड्या टेलिकॉम कंपन्यांच्या परवान्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका १ कोटी मोबाईलधारकांना बसणार आहे.

स्पेक्ट्रम लिलाव जिंकण्यात या कंपन्यांना ज्या राज्यात अपयश आले त्या ठिकाणची आपली सेवा बंद करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. ‘युनिनॉर’ ही कंपनी केवळ ६ क्षेत्रांतच स्पेक्ट्रमचा लिलाव जिंकू शकली. त्यामुळे उर्वरित मुंबई, कोलकाता आणि बंगाल या ३ क्षेत्रांत या कंपनीला आपली सेवा बंद करावी लागणार आहे. व्हिडीओकॉन कंपनीला लिलावात ६ क्षेत्रे मिळाली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र, तामीळनाडूसमवेत ११ बड्या क्षेत्रात या कंपनीला आपली सेवा खंडित करावी लागणार आहे. टाटा टेलीने सुरुवातीलाच जम्मू, कश्मीर, आसाम आणि उत्तर-पूर्व राज्यांत आपली ‘सीडीएम’ सेवा बंद केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये या कंपन्यांचे परवाने रद्द केले होते. मात्र १८ जानेवारीपर्यंत त्यांना आपली सेवा देण्याविषयीची सवलत न्यायालयाने दिली होती.
दरम्यान, टेलिकॉम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सर्वोच्च न्यायालयात स्पेक्ट्रमचा लिलाव संपण्यापूर्वी आपली सेवा सुरू करण्याविषयी वेळ मागू शकते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS