स्तन कॅन्सर जागृतीसाठी महिला धावल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2012

स्तन कॅन्सर जागृतीसाठी महिला धावल्या

मुंबई : स्तन कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी तसेच रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने भारतामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पिंकाथॉन आंतरराष्ट्रीय महिला स्पर्धेमध्ये किरण तिवारी ही विजेती ठरली. या स्पर्धेला बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने हिरवा झेंडा दाखवला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित 10 किलोमीटरच्या या धावण्याच्या स्पर्धेचे नेतृत्व प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने करण्यात आले. विविध क्षेत्रांशी संबंधित दोन हजारहून अधिक महिलांनी या
स्पर्धेत भाग घेऊन या अभियानाला आपला पाठिंबा दर्शविला. 10 किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेमध्ये किरण तिवारी ही विजेती ठरली, तर पाच किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये मयूरी सुतार हिने बाजी मारली. तीन किलोमीटरच्या स्पर्धेत निकिता इंगळे हिने विजय मिळवला. पिंकाथन आंतरराष्ट्रीय महिला स्पर्धा आयोजनातून जमा झालेल्या निधीचा वापर वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्हद्वारे सुरू असलेल्या स्तन कॅन्सरविरोधातील लढय़ासाठी वापरला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS