इंदू मिल साठी रिपब्लिकन पँथरचा आत्मदहनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2012

इंदू मिल साठी रिपब्लिकन पँथरचा आत्मदहनाचा इशारा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन देण्याचा निर्णय 6 डिसेंबरपूर्वी न झाल्यास रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आत्महदन करतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे. 

केंद्र आणि राज्य शासन इंदू मिलचा प्रश्न मराठवाडा विद्यापीठ नामंतराप्रमाणे चिघळत ठेवत असल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. खरात यापूर्वी रिपाइं मध्ये कार्यरत होते. महायुतीनंतर त्यांनी रिपब्लिकन पँथर संघटनेची स्थापना केली. 2010 मध्ये 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीला चैत्यभूमीवर वंदन करण्यास आलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना रोखून इंदु मिलच्या निर्णयास विलंब होत असल्याबद्दल पँथरच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यंगचित्र शालेय पाठ्यपुस्तकात सामील केल्याबद्दल पँथरने आंदोलन उभारले होते

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS