मच्छीमार कोळी समाजाने जगायचे कसे - रमण पावसे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2012

मच्छीमार कोळी समाजाने जगायचे कसे - रमण पावसे

मुंबई / प्रतिनिधी 
एकीकडे सागरी प्रदूषण व समुद्रावरील अतिक्रमण होत असताना मच्छिमार कोळी समाजाने  ‘जगायचं कसं ? ’ असा सवाल मच्छीमारांचे युवा नेते  रमण पावसे यांनी एका कफपरेड मच्छीमार वसाहतीमध्ये झालेल्या सभेमध्ये केला आहे.  

महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि.मी.च्या किनारपट्टीवर मच्छिमार कोळी समाजा आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण १४ ते १५  टक्के असलेल्या मच्छिमारांना एकीकडे सागरी प्रदूषण व समुद्रावरील अतिक्रमण होत आहे. मासेमारीचा दुष्काळ आहे. तर एकीकडे शासन सासूसुनेच्या भानगडीत गुंतले आहे. "दर्याचे राजे" म्हणून घेणाऱ्या मच्छिमारांचा दर्याचा आधार निघून चालला आहे, मुंबई कोळ्यांची हाय...! असे म्हणतात. परंतू मुंबईतील भूमीचा आधार हि हिराऊन घेत आहेत. 

काही दिवसा पूर्वी मुख्यमंत्र्यांनी व केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मत्स्यविकासाच्या घोषणा केल्या होत्या. केंद्राने सुधारित किनारा नियंत्रण कायद्याची अधिसूचना जारी करून मच्छिमारांच्या प्रश्नाबाबतची उदासीनता झटकण्याचा प्रयत्न केला परंतू आजही कोळी समाज त्रस्त असल्याचे पावसे यांनी सांगितले.

या मेळाव्यात नवनिकेतन कोळी समाज सेवा मंडळ पाज-पंढरी (मुंबई)चे अध्यक्ष लक्ष्मण दोराकूळकर, रामचंद्र पाटील, काशिनाथ पावसे, दशरथ पाटील, बाळकृष्णा पावसे, बाळकृष्णा वाघे,वासुदेव पां. पाटील, तसेच शिव शास्त्री मच्छीमार वसाहतीतील प्रमुख कार्यकर्ते भास्कर पावसे, नरेंद्र वाघे, कृष्णा तांडेल मोतीराम वाघे,विजय चोरढेकर, विजय कदम  इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS