मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेला चौथरा ताबडतोब हटवण्यात यावा,अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,अशी ताकीद बृहन्मुंबई महापालिकेने महापौर सुनील प्रभू आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिली आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात सोमवारी रात्री उशिरा दोन्ही शिवसेना नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी पालिका आयुक्तांनी शिवाजी पार्क मैदानावर 'विशेष बाब' म्हणून चौथरा उभारण्यास परवानगी दिली होती. मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विनंती अर्जानुसार ही परवानगी केवळ 24 तासांसाठी देण्यात आली होती,मात्र 14 दिवस उलटले तरी शिवसेनेने तो चौथरा न हटवल्यामुळे पालिका आयुक्तांनी सोमवारी रात्री उशिरा सुनील प्रभू व संजय राऊत या दोन नेत्यांना नोटीस बजावून संबंधित चौथरा तत्काळ हटवण्याची सूचना केली.
तो चौथरा तातडीने हटवा,अन्यथा कायदेशीर कारवाईचा पर्याय विचारात घेतला जाईल,अशी ताकीद पालिका आयुक्तांनी नोटिशीद्वारे दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी उभारलेला चौथरा,चौथर्याभोवतीचा मंडप तसेच मंडपात ठेवलेला शिवसेनाप्रमुखांचा फोटो तत्काळ हटवण्यात यावा,असे आयुक्तांनी नोटिशीत म्हटले आहे. पालिकेच्या नोटिशीनंतरही शिवसेना नेत्यांनी स्वत:हून चौथरा न हटवल्यास पालिकेला पोलीस बंदोबस्तात तो चौथरा हटवावा लागेल,असेही आयुक्तांनी सांगितले. यासंदर्भात पालिका आयुक्तांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना पत्र पाठवले आहे. त्या पत्राद्वारे चौथरा हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती करण्यात आली आहे.
वरिष्ठ निर्णय घेतील - महापौर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले,ते ठिकाण लाखो शिवसैनिकांसाठी 'पवित्र स्थान'आहे. या चौथर्यावर कारवाई करण्यापूर्वी पालिका आयुक्तांनी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची धमक दाखवावी. या प्रकरणी आपण सरकारशीही चर्चा करणार असून या चौथऱ्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो शिवसेनेचे वरिष्ठ घेतील.अशी प्रतिक्रिया महापौर सुनील प्रभू यांनी दिली.

कायदेशीर कारवाही करणार - पालिका आयुक्त
शिसेनेला दिलेल्या परवानगीची वेळ संपली आहे. यामुळे आता कायदेशीर कारवाही केली जाईल असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

No comments:
Post a Comment