प्रत्येक जण नेता होत आहे, ही नकारात्मक बाजू आहे - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2012

प्रत्येक जण नेता होत आहे, ही नकारात्मक बाजू आहे - रामदास आठवले


दलित समाजाला आता राजकारण कळू लागले आहे. ही सकारात्मक बाब असली, तरी प्रत्येक जण नेता होत आहे, ही नकारात्मक बाजू आहे. दलित समाजात मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. दलित समाजातील अनेक तरुण राजकारणात येत आहेत; मात्र प्रत्येकाला नेता बनण्याचीच घाई आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान होते, असे मत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले. 

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज राष्ट्रीय दलित परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.दलित समाजातील अनेक तरुण राजकारणात येत आहेत; मात्र प्रत्येकाला नेता बनण्याचीच घाई आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान होते. त्यामुळे आधी कार्यकर्ता व्हायला हवे. दलित समाजातील गटबाजीमुळे चळवळीचेही नुकसान होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातील रिपब्लिकन पक्ष एक ते दोन दशकात स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

देशात सन 2001 च्या जनगणनेनुसार दलितांची संख्या 16.2 टक्के, तर दलित व आदिवासींची संख्या 24.4 टक्के आहे. या लोकसंख्येनुसार दलित-आदिवासींच्या विकासासाठी निधी सोडायला हवा. यंदा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 15 ते 16 लाख कोटी रुपयांचा असेल. त्यानुसार दलित-आदिवासींच्या उत्कर्षासाठी चार लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी या परिषदेत करण्यात आली. त्याचबरोबर दलित भूमिहिनांना पाच एकर जमीन, उद्योग व नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, खासगी क्षेत्रात आरक्षणासाठी कायदा आदी मागण्या करण्यात आला. सहकार क्षेत्रात दलितांनीही उतरावे, असे आवाहनही करण्यात आले. 

"एफडीआय'ला मंजुरी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतात गुंतवणूक होईल, असे मत व्यक्त करताना, नव्या कंपन्यांमध्येही दलितांना आरक्षण ठेवावे, अशी मागणी उदित राज यांनी याप्रसंगी केली. यावेळी  माजी खासदार रामनाथ कोविंद, उदित राज, डॉ. कृष्णा सामी, जॉन पांडियन, नामदेव ढसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS