रिपब्लिकन जनतेचा जल्लोष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपब्लिकन जनतेचा जल्लोष

Share This
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य स्मारक निर्माण व्हावे, असे गेल्या अनेक वर्षापासून देशातील कोटय़वधी दलित समाजाचे असलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. रिपब्लिकन कार्यकत्र्यांच्या आंदोलनामुळे चैत्यभूमीलगतची इंदू मिलची साडेबारा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या मागणीपुढे केंद्र आणि राज्य सरकारलाही अखेर झुकावे लागले. इंदू मिलची सर्वच्या सर्व जमीन आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात येत असल्याची बुधवारी संसदेत ऐतिहासिक घोषणा केली अन् दोन्ही सभागृहांत सदस्यांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर तर अवघ्या देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईसह राज्यातील दलित वस्त्यांमध्ये एकमेकांचे अभिनंदन करत आंबेडकरी जनतेने आपल्या लढय़ाचा विजयोत्सव साजरा केला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय चैत्यभूमीवर आदरांजली अर्पण करत थेट इंदू मिलसमोर गर्दी करत होता. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages