बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाबद्दल सरकार अनभिज्ञ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाबद्दल सरकार अनभिज्ञ!

Share This
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाबद्दल कोणतीही माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार कायद्यां (आरटीआय) तर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून समोर आली आहे.

आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या माहितीला केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयांनी आणि आंबेडकर प्रतिष्ठानने दिलेल्या उत्तरामध्ये आपल्याकडे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाशी संबंधित कोणतीही माहिती नसल्याचे कळवले आहे. अर्जदाराने मागितलेली माहिती कोणत्या विभागाशी संबंधित आहे, याची कोणतीही माहिती आम्हाला नाही, असे एका मंत्रालयाच्या माहिती अधिकार्‍याने म्हटले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आर. एच. बन्सल यांनी राष्ट्रपती सचिवालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण कसे? आणि कोणत्या ठिकाणी झाले होते? त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर शवविच्छेदन करण्यात आले होते काय? अशी विचारणा करतानाच तसे असेल तर त्या अहवालाची एक प्रत द्यावी, अशी मागणी केली होती. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण नैसर्गिक होते की अनैसर्गिक? ती तारीख कोणती होती? त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरची चौकशी एखादा आयोग अथवा समितीने केली होती काय? आदी माहिती या अर्जाद्वारे मागवली गेली होती. राष्ट्रपती सचिवालयाने हा अर्ज गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. गृहमंत्रालयाने ही कोणत्याही सरकारी विभागाकडे नसल्याचे म्हटले आहे. याविषयीची माहिती सामाजिक न्याय मंत्रालयाकडे असण्याची शक्यता असल्याने हा अर्ज या मंत्रालयाकडेही पाठवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages