मुंबई : हार्बर मार्गावरील नऊ डब्यांच्या लोकल बारा डब्यांमध्ये परावर्तीत करण्याचा 714 कोटी रुपयांचा प्रकल्प मार्गी लावण्यातील अडथळे आता दूर झाले आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून अडथळे निर्माण झाले होते. त्यातील मान्यतेचे अडसर दूर झाल्याने हा प्रकल्प डिसेंबर अखेरीस सुरू केला जाणार आहे. सरकार आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) या प्रकल्पात समप्रमाणात भागीदार आहेत. एमआरव्हीसी या प्रकल्पासाठी आवश्यक त्या कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली होती. प्रकल्पासाठी ऑक्टोबरपर्यंत परवानगी मिळण्याची अपेक्षा एमआरव्हीसीला होती; परंतु प्रत्यक्ष नोव्हेंबरपर्यंतही त्यास मंजुरी मिळत नसल्याने रेल्वे अधिकार्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. सरकारच्या अनास्थेपायी प्रकल्पातील किमान दोन महिने वाया गेल्याची रेल्वे अधिकार्यांची भूमिका होती. अखेरीस सरकारने त्यास मान्यता देताच एमआरव्हीसीने लगोलग कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मधल्या काळात सरकारने या प्रकल्पात सहभागी होण्याची केलेली सूचना सिडकोने मान्य केली. त्यानुसार सिडकोने 350 कोटी रुपये प्रकल्पास देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एमआरव्हीसीने तीन वर्षाच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आखली आहे; परंतु सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याने प्रकल्पाचे वेळापत्रक बिघडून गेल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
Home
Unlabelled
हार्बर मार्गावरील प्रकल्प डिसेंबरअखेर सुरू
हार्बर मार्गावरील प्रकल्प डिसेंबरअखेर सुरू
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment