सुरक्षित मुंबईसाठी पोलीस आयुक्तांचा धडक कृती कार्यक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2012

सुरक्षित मुंबईसाठी पोलीस आयुक्तांचा धडक कृती कार्यक्रम

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सात सूत्री योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे महिलांवरील अत्याचाराची प्रत्येक तक्रार पोलीस उपआयुक्त स्वत: हाताळतील आणि तत्परतेने तपास केला जाईल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

मुंबईत ठिकठिकाणी एक हजार तक्रार पेट्या बसविण्यात आल्या आहेत. ही संख्या चार हजार इतकी केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या सुमारे १० तक्रार पेट्या आहेत. ही संख्या प्रत्येक पोलीस ठाण्यामागे ३० ते ३५ वर जाईल, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
‘‘बलात्काराची घटना ही पोलीस दलासाठी लाजिरवाणी, शर्मेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे, पण महिलांवरील अत्याचारांच्या संख्येवर जाऊ नका. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी हे ओळखीचेच आहेत. त्यामुळे या आकडेवारीवरून मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. मुंबई सुरक्षितच आहे.’’

महिलांवरील अन्यायाची कोणतीही तक्रार दाखल होताच पोलीस ठाण्यामार्फत पोलीस उपायुक्तांना तत्काळ कळविण्यात येईल. या गुन्ह्यांचा तपास अल्पावधीत पूर्ण करणार आहे. पोलीस ठाण्यांमध्ये (विशेषत: मुस्लिमबहुल व झोपडपट्टी) भागात महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची संख्या वाढवणार आहे. महिला पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक पोलीस ठाणे व बीट चौक्यांवर लावणार आहे. महिलांवरील अत्याचारासंबंधित गुन्हेगारांचे फोटो व माहिती पोलीस ठाण्यात ठेवणार. महिला बचत गट, राजकीय पक्षांचे महिला कक्ष, महिलांच्या संस्था यांच्या बैठका आयोजित करणार आहे . परिसरातील महिला आणि पोलीस यांच्या सह्या असलेल्या महिला दक्षता समित्यांचे पुनर्गठन करणार आहे. महिला निर्भयपणे तक्रार करण्यासाठी पुढे याव्यात यासाठी पोलीस ठाण्यांतील वातावरण घरच्याप्रमाणे भावनिक करणार. यासाठी पोलिसांना तसे मार्गदर्शन करणार आहे असे डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS