मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर डेंटल व मेडिकलच्या अधिष्ठातांना एक कक्षा द्यायची की वेगवेगळी कक्षा द्यायची, याचा निर्णय आयुक्तांनी राखून ठेवला आहे. यामुळे डॉ. संध्या कामत यांची संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) पदी झालेली नियुक्ती तात्पुरती असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी स्थायी समितीत केले.
शिवसेना नगरसेविका डॉ. शुभा राऊळ यांनी नायर डेंटलच्या डीन डॉ. सुहासिनी नागदा यांना डावलून डॉ. संध्या कामत यांची संचालकपदी नेमणूक केल्याच्या हरकतीच्या मुद्दय़ाला प्रशासनाकडून दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याचे सांगत राऊळ यांनी डॉ. नागदा यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे सप्रमाण दाखवून दिले. यापूर्वी डॉ. नागदा यांच्या संचालकपदासाठी नियुक्तीचा प्रस्तावही तयार होता. त्याचे काय आले? असा सवाल डॉ. शुभा राऊळ यांनी उपस्थित केला.यावर बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी डॉ. एस. जी. दामले हे दंत रुग्णालयाचे डिन असतानाही 1 ऑक्टोबर 1999 पासून त्यांची एक वर्षासाठी संचालक पदावरील नेमणूक नियमित तत्त्वावर करण्यास अद्ययावत सुधारित अधिनियम 1888 च्या काळात 80 (अ) अन्वये या ठरावास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली असल्याची आठवण करून दिली. त्यामुळे डॉ. नागदा यांची संचालकपदी नेमणूक झाली पाहिजे, असे पिसाळ यांनी सांगितले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनीही शासनाच्या जीआरनुसार डॉ. नागदा यांचा विचार झाला पाहिजे, असे स्पष्ट केले, नाहीतर त्यांच्या अन्याय होईल, असे सांगितले. या संदर्भात मनीषा म्हैसकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, डॉ. नागदा यांचे निवेदन आयुक्तांकडे आले आहे. त्या निवेदनाचे परीक्षण करण्यात येत असून त्यांचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
Post Top Ad
20 December 2012
Home
Unlabelled
डॉ. संध्या कामत यांची नियुक्ती तात्पुरती - म्हैसकर
डॉ. संध्या कामत यांची नियुक्ती तात्पुरती - म्हैसकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment