मुंबई / अजेयकुमार जाधव
शिवाजी पार्क निळे झाले असताना मध्ये भगवे काय असे पहावयास येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना मंडपात येवून ठाकरेंचे दर्शन घ्या असे सांगणाऱ्या शिवसैनिकांचा डाव भीमसैनिकांनी उधळवून लावला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेवून शिवाजी पार्क येथे आंबेडकरी अनुयायी येत होते. संपूर्ण शिवाजी पार्क निळे झाले असताना मध्ये भगवे काय दिसते म्हणून ठाकरेंच्या अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी जात होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाहताच सर्वांचे पाय मंडपा बाहेर थांबत होते.
तरीही काही शिवसैनिक जबरदस्तीने आत मध्ये या आणि दर्शन घ्या असे जबरदस्तीने सांगत असल्याने याच ठाकरेंनी " आमच्या घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ " असे म्हटले होते. आम्ही यांचे दर्शन कसे घेवू असे म्हणत आंबेडकरी जनता या मंडपापासून दूर जात होती. काही आंबेडकरी लोक जर खरे बौद्ध असाल तर ठाकरेंचे दर्शन घ्यायला जाऊ नका असे सांगत होते.
हा प्रकार समजताच बसपाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या अंत्यसंस्कार झाले त्या मंडपाजवळ येवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा देत आंबेडकरी जनतेला जबरदस्ती दर्शन घ्यायला भाग पडू नका असा सज्जड दम शिवसैनिकांना दिला यावेळी उपायुक्त धनंजय कुलकर्णी व पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करून शिवसैनिकांनी जबरदस्तीने दर्शन घ्यायला सांगू नका अशी समज दिली. यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान याबाबत बसपाचे विलास गरुड यांच्याशी संपर्क साधला असता हे कार्यकर्ते आपले असल्याचे मान्य करत जबरदस्तीने दर्शन घ्या सांगून भोळ्या भाबड्या अशिक्षित लोकांना गुमराह केले जात होते म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीचे दर्शन देणे हा प्रकार बंद करायला लावला आहे. असे प्रकार रामदास आठवले सारख्या नेत्यांमुळे होत असून आठवले आपल्याला खासदारकी मिळावी म्हणून समाजालाही विकू शकतात यामुळे आठवले यांना लवकरात लवकर वेड्यांच्या रुग्णालयात भारती करावे असे सांगितले.
उत्तर प्रदेश मध्ये बाबासाहेबांची १०० ते १५० एकर जागेवर स्मारक आहेत. मुंबई मधील इंदू मिलची बारा एकर जागा आंबेडकरी जनतेची मते मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांनी दिली आहे. आंबेडकरी जनतेचे नेते म्हणवणाऱ्या नेत्यांनी येत्या निवडणुकीत मतदान करणार नाही अशी धामिकी जरी दिली असती तर सरकारने १०० एकर जागेवर सुद्धा स्मारक बांधून दिले असते असे गरुड म्हणाले.


No comments:
Post a Comment