मुंबई / अजेयकुमार जाधव
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भीमसैनिकांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केले.चैत्यभूमीवर आंबेडकरांचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी दुपारपासूनच रांगा लागल्या होत्या. रात्री ३ वाजता ही रांग वरळीपर्यंत गेली होती. आठ ते दहा तास शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत थांबून २५ लाख भीमसैनिकांनी बाबासाहेबांना वंदन केले.
इंदू मिल ५ डिसेंबर पूर्वी न मिळाल्यास विविध संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता यामुळे यावर्षी चैत्यभूमीच्या प्रवेश मार्गात बदल करून इंदू मिलच्या मागील बाजूने दर्शनाची रांग नेण्यात येणार होती परंतु इंदू मिलचा तिढा सुटल्याने दरवर्षीप्रमाणे रांगेचा मार्ग इंदू मिलसमोरून पूर्ववत करण्यात आला. पालिकेच्या वतीने चैत्यभूमी येथे आलेल्या अनुयायांसाठी विविध सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या.
दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले, डोक्यावर निळी टोपी किवा डोक्यावर निळ्या जयभीम लिहिलेल्या पट्ट्या बांधलेले अनुयायीच दिसत होते.बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनीही हि गर्दी बघून एवढी गर्दी असे उदगार काढून या पैकी अर्धी सुद्धा गर्दी बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला सुध्दा नव्हती असे मान्य केले.
भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता यावे यासाठी समता सैनिक दलाचे दोन हजार सैनिक व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पाच हजार कार्यकर्ते अहोरात्र तीन दिवस कोणताही मानधनाविना सेवा देत होते. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या एनएस एस विभागाचे शंभर तर कीर्ती महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी रांगेमधील लोकांना सहकार्य करत होते.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना बेस्ट ,आयडीबीआय, आरसीएफ, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडिअन ओईल,पालिका ई विभाग कार्यालय, एअर इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक या कंपन्यांमधील मागासवर्गीय कर्मचार्यांच्या वतीने भोजन दान, पाणी, चहा, बिस्कीट तसेच वैद्यकीय मदत केली.
चैत्यभूमी येथे येवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालक मंत्री जयंत पाटील, नितीन राऊत, शिवाजी मोघे, वर्षा गायकवाड, सचिन अहिर या मंत्र्यांनी तसेच महापौर सुनील प्रभू, उप महापौर मोहन मिठबावकर, गोपीनाथ मुंडे, अजित पवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, एकनाथ गायकवाड, बाला नांदगावकर, बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, चंद्रकांत हंडोरे, पोलीस आयुक्त सत्यपाल सिंघ, सदानंद दाते यांनी आदरांजली वाहिली.
बाबासाहेबच श्रेष्ठ
सायंकाळी चारच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, सचिन आहिर यांनी चैत्यभूमी, इंदू मिल व शिवाजी पार्क परिसरात पुष्पवृष्टी केली. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या चौथऱ्यावर पुष्पवृष्टी न केल्याने बाळासाहेबान पेक्षा बाबासाहेब श्रेष्ट असल्याचे दाखवून दिले.
कार्यकर्त्यांचा वाद
चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी बंद केले असतानाही रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैत्यभूमीतील प्रवेशावरून काही वेळ वाद उद्भवला होता.
Photo - Uday Kasare


No comments:
Post a Comment