मुंबई / अजेयकुमार जाधव
बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यास सर्व पक्षीय नेते चैत्याभूमिकडे येत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र बाबासाहेबांकडे पाठ फिरवल्याचे चित्र महापारीनिर्वान दिनी दिसले. यामुळे रामदास आठवले यांना हि जबरदस्त चपराक असल्याचे बोलले जात आहे
बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसेचे नेते चैत्यभूमी मध्ये आले होते. या वेळी शिवसेनेचे नेते का उपस्थित नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बाबासाहेबांच्या समाजाबाबत शिवसेनेला आस्था नसल्यानेच बाबासाहेबांना श्रद्धांजली वाह्ण्याकडे शिवसेनेने पाठ फिरवल्याचे बोलले जात होते. शिवसेनेचे महापौर सुनील प्रभू हे सुद्धा राजशिष्टाचार म्हणूनच येथे येवून गेले. आंबेडकरी जनतेचे नेते म्हणवणारे रामदास आठवले यांनी तर शिवसेने बरोबर महायुती केली आहे त्यांनी बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेबांचे दर्शन घ्या असे आवाहन केले होते. असे असताना शिवसेनेचे नेते बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. इंदू मिल बाबत आदोलन करताना सुध्दा शिवसेनेने आमचा पाठींबा आहे असे बोलून रस्त्यावर उतरण्याचे टाळले होते. आता महापारीनिर्वान दिनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यास शिवसेना नेत्यांनी पाठ फिरवल्याने महायुती करणाऱ्या रामदास आठवले यांना मोठी चपराकच दिल्याचे बोलले जात आहे.


No comments:
Post a Comment