महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेची तयारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेची तयारी

Share This
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जमणार्‍या जनसागराचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस, वाहतूक विभाग, बेस्ट प्रशासन तसेच विविध संस्था कार्यरत झाल्या आहेत. 5 डिसेंबरपासूनच शिवाजी पार्कवर महापालिकेकडून विविध सोयी पुरवण्यात आल्या आहेत. 

बुधवारी सकाळी जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे हजर होते. या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी महापालिकेतर्फे पुरवण्यात आलेल्या विविध नागरी सेवासुविधा यांची माहिती देण्यात आली आहे.

या दिवशी परदेशातून येणार्‍या नागरिकांसाठी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पालिकेतर्फे विविध नागरी सेवासुविधा पुरवण्यात येणार आहेत. या ठिकाणी नियंत्रण कक्ष तसेच शिवाजी पार्क कक्षाशेजारी, कॅटरिंग महाविद्यालयाजवळ आणि सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ अशा तीन ठिकाणी रुग्णवाहिका, अंदाजे 1 लाख 30 हजार चौ.फू . क्षेत्रफळात अनुयायांसाठी तात्पुरता निवारा अशा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानात वेगवेगळ्या ठिकाणी 10 ठिकाणी शौचकूप असणारी 15 फिरती शौचालये, इंदू मिलच्या पाठीमागे 150 बंदिस्त शौचालये तसेच 250 स्नानगृहांची सुविधा करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीपुरवठा करणारे नळ आणि टँकर्स, विद्युत व्यवस्था, आवश्यक असणारी अग्निशमन व्यवस्था, त्याचप्रमाणे वडाळा (दादर पूर्व) येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages