आंबेडकर स्मारकाचे काम तीन टप्प्यांत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंबेडकर स्मारकाचे काम तीन टप्प्यांत

Share This

पैशांची कमतरता नाही - मुख्यमंत्री
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार असून त्यासाठी पैशांची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

260 अन्वये विधानपरिषद सदस्य सुभाष चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयीच्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. स्मारकाच्या तीन टप्प्यांविषयी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, संकल्पना, वास्तुशिल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी या विषयांवर सखोल अभ्यास करून स्मारकाचे भव्यदिव्य रूप कसे साकारता येईल, याचा विचार केला जाईल. त्यासाठी एक वेगळी कमिटी तयार करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्किटेक्टकडून काम करून घेणार आहोत. यासाठी सरकार कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व आंबेडकर विचारांच्या प्रसाराचे कें द्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताच्या महासत्तेचा पाया भारतीय संविधानात रचला आहे. वाचनालय, स्तंभ, नॉलेज सेंटर, म्युझियम, महिलांसाठी अध्ययन कक्ष आदींसंदर्भात अनेकांनी सूचना केल्या आहेत. याचाही विचार हे स्मारक निर्माण करताना करावा लागेल. याचा इतिहास विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले, 2005 मध्ये 

चैत्यभूमीच्या सुशोभीकरणासंदर्भात एक सुकाणू समिती स्थापन केली होती. कालांतराने समितीच्या बैठका झाल्या नव्हत्या. नंतर मी पुढाकार घेतल्याने समितीच्या बैठका झाल्या. साडेबारा एकर इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी पुढे आल्यानंतर यावर सत्ताधारी व विरोधकांचे एकमत झाले. तसा ठराव सरकारने 20 डिसेंबर 2011 रोजी पारित केला होता. हा ठराव एका जनादेशात पारित झाला. तो घेऊन भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मांडला. सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. केंद्रीय पर्यावरणमंर्त्यांनाही भेटले. यासंदर्भात बैठका घेऊन इंदू मिलच्या जागेसंदर्भातील आरक्षण बदलण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठय़ा उंचीचे नेते होते. त्यांच्या घटनेमुळेच आज देश एकसंध आहे. म्हणूनच त्यांचे स्मारक हे भव्यदिव्य असावे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणार आहे. हे स्मृतिस्थळ प्रेरणादायी असेच राहील. अनेकांचे सामूहिक प्रयत्न यासाठी कामी आले आहेत. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय वस्त्रोद्योगमंर्त्यांचाही मुख्यमंर्त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages