परंतु रामदास आठवलेंच्या समर्थकांना आंबेडकर यांचा महापारीनिर्वानासाठी देशभरातून लाखो लोक दुखित अंतकरणाने अभिवादन करण्यासाठी आले आहेत याचे भानच राहिले नव्हते. आठवले फक्त अभिवादन करतील कुणीही फटाके फोडू नयेत असे आदेश कार्यकर्त्यांना दिले असतानाही आनंद व्यक्त करण्यासाठी बेभान झालेल्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. एकीकडे आंबेडकरी जनता दुखित अंतकरणाने अभिवादन करत असताना फटाके फोडल्याने "या कार्यकर्त्यांना अक्कल आहे कि नाही" असा प्रश्न उपस्थित करत भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो आंबेडकरी जनतेमध्ये आठवले व त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे.


डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी केंद्र सरकारने इंदू मिलची जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी हस्तांतराची घोषणा करून डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना गोड भेट दिली.हि बातमी कळताच आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, राजेंद्र गवई, विजय कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इंदू मिल समोर येवून आनंद व्यक्त केला.


No comments:
Post a Comment