शिवसैनिकांकडून आर्थिक नुकसान पालिका वसूल करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2012

शिवसैनिकांकडून आर्थिक नुकसान पालिका वसूल करणार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वरळी येथील गॅरेजमधील वाहनांची तोडफोड करून या गाळ्यांचे सुमारे 80 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान करणार्‍या शिवसैनिकांकडून झालेले आर्थिक नुकसान पालिका वसूल करणार असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सोमवारी रात्री वरळी वॉर्ड कार्यालयातील पालिका कर्मचारी चौथरा हटविण्यासाठी येणार असल्याचे कळल्याने काही शिवसैनिकांनी वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि परिसरातील नऊ वाहनांची तोडफ ोड केली होती. या वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. यामुळे पालिकेचे सुमारे एक लाख रुपायांचे नुक सान झाले होते. या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन शिवसेना शाखाप्रमुखांचाही समावेश होता. सार्वजनिक मालमत्तेचे अशाप्रकारे नुकसान झाल्यास ते वसूल करण्याचा न्यायालयाच्या निर्णय आहे. या निर्णयानुसार ज्या शिवसैनिकांनी पालिका गाडय़ांची तोडफोड करून नुकसान केले त्यांच्याकडून ही नुकसानभरपाई वसूल केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS