रिपाइंची आझाद मैदानात निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2012

रिपाइंची आझाद मैदानात निदर्शने

मुंबई : अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय समाजाला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी अधिवेशनामध्ये त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला होता, मात्र गुरुवारी आठवले यांचे आंदोलन आहे म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवला होता. इंदू मिलच्या प्रकरणानंतर रिपाइं आक्रमक झाली आहे. सरकारच्या मागे लागलेल्या रिपाइंने गुरुवारी नोकर्‍यांमध्ये पदोन्नतीचे आरक्षण हा विषय घेऊन आंदोलन केले. पुढील आठवडाभर देशभर रिपाइंकडून या व आदी विषयावर तीव्र आंदोलन करण्यात येतील. मंत्रालयावर निळा-भगवा फडकवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही, असा इशाराही आठवले यांनी या वेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS