शिवाजी पार्क मैदानास 'शिवतीर्थ' नाव देण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवाजी पार्क मैदानास 'शिवतीर्थ' नाव देण्याची मागणी

Share This
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्कवर नेहमी भाषण करताना या मैदानाच्या उल्लेख 'शिवतीर्थ' असा करीत असून त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी या मैदानास शिवतीर्थ म्हणून नाव द्यावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर चिरविश्रंती घेतली. त्यांच्या पार्थिवास शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अग्नी दिला. बाळासाहेबांचे आणि शिवाजी पार्कचे नातेसुद्धा जन्मापासून होते. बाळासाहेबांचा जन्म 1925 सालचा आणि शिवाजी पार्कचा जन्मही 1925 सालचा असल्याने हा एक योगायोग आहे. या जागेवर बाळासाहेब कायमचे विसावले, ती जागा श्रद्धा आणि शक्तीचे स्थान बनले आहे. शिवाजी पार्क देशाच्या नकाशावर आले ते बाळासाहेबांमुळेच. त्यामुळे शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे हे नाते कायमचे राहणार असल्याने बाळासाहेब ज्या शिवाजी पार्कच्या उल्लेख शिवतीर्थ करीत त्या मैदानास 'शिवतीर्थ' मैदान असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

10 मे 1927 साली झाले होते शिवाजी पार्क नामकरण
मुंबई महानगरपालिकेत 10 मे 1927 रोजी जी. बी. नारे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी माहिम पार्कचे नाव बदलून शिवाजी पार्क असे नामकरण करण्याचा ठराव मांडला होता. यावर पालिका प्रशासनाकडून शिवाजी महाराजांच्या स्मृती चिरंतर राहाव्यात, यासाठी माहिम पार्कचे नामकरण शिवाजी पार्क असे करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages