महापरिनिर्वाणदिना निमित्त वाहतुकीत बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाणदिना निमित्त वाहतुकीत बदल

Share This

मुंबई / अजेयकुमार जाधव 
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने वाहतूक पोलिसांनी महापरिनिर्वाण दिनी दादर, परळ परिसरात वाहतुकीत बदल केला आहे. 

एस.व्ही.एस.रोड, रानडे रोड, एन.सी.केळकर रोड, केळुस्कर रोड, एज.ले.रोड, गोखले रोड, दक्षिण व उत्तर टी.एच. कटारिया रोड, टिळक ब्रिज, भवानी शंकर रोड, एस.के. बोले मार्गावरून जाणार्‍या प्रवासांनी सेनापती बापट मार्ग, ना.म.जोशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा वापर करावा. भवानी शंकर रोड हा रस्ता कबूतरखान्यापासून गोखले रोड दक्षिण जंक्शनपर्यंत एक दिशा राहणार आहे.

बेस्ट आणि अत्यावश्यक वाहनांना या मार्गावरून प्रवेश देण्यात येणार आहे. माटुंगा आणि दादर पश्चिम परिसरातील रहिवाशांनी आपल्या गाडय़ा हिंदुजा हॉस्पिटलकडून पांडुरंग नाईक मार्गावर पार्क कराव्यात. ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस.व्ही.एस.रोड जंक्शनपासून बेस्ट बसेसना दादर टी.टी.कडून कोतवाल गार्डनच्या दिशेने प्रवेश करण्याची मुभा आहे. सर्व प्रकारच्या जड वाहनांना माहिम जंक्शन येथून मोरी रोडमार्गे सेनापती बापट मार्गावर वळवण्यात आले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाने माहिमच्या दिशेने येणारी वाहने कलानगर जंक्शनहून धारावी टी जंक्शन येथून सायन किंवा धारावीमार्गे पुढील प्रवास करू शकतात.

महालक्ष्मी स्थानकाकडून उत्तर वाहिनीवरून जाणार्‍या वाहनांनी डॉ. ई.मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्ग जाण्यास सांगण्यात आले असून सेनापती बापट मार्ग व फाईव्ह गार्डन माटुंगा येथे वाहने उभी करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages