मुंबई - बेस्ट उपक्रमामधील विद्युत आणि परिवहन या विभागातील कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता अधिकाऱ्यांनाही लवकरच ७ हजार ते ११ हजार रुपये इतकी घसघशीत वेतनवाढ मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने वेतनवाढीचा प्रस्ताव तयार केला असून बेस्ट समितीच्या आगामी बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. या निर्णयाने दरवर्षी दहा कोटी रुपयांचा बोजा उपक्रमावर पडणार आहे.
वेतनवाढीपाठोपाठ अधिकाऱ्यांना घरभाडे आणि रजेच्या भत्त्यात दुप्पट वाढ करण्यात येणार आहे. "अ' श्रेणी अधिकाऱ्यांना ७ हजार रुपये, तर "ब' श्रेणी अधिकाऱ्यांना ११ हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. त्यामुळे "ब' श्रेणी अधिकाऱ्यांचे वेतन २७ हजार रुपयांवरून ४० हजार रुपये होणार आहे. अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. १९ एप्रिल २०११ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट ऑफिसर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना १० एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१६ या पाच वर्षांसाठी ही वेतनवाढ देण्यात येणार आहे. या वेतनवाढीपोटी बेस्ट प्रशासनावर २९ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
अधिकाऱ्यांना वेतनवाढ देताना गेल्या २००६ ते २०११ या कालावधीची थकबाकी न देण्याचा निर्णय बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी घेतला आहे. ग्रॅज्युईटी एक ते दोन लाखांनी कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे वेतन वाढले तरी भत्त्यात वाढ होणार नसल्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे थकबाकीसह भत्ते मिळावेत, अशी मागणी करणार असल्याची माहिती सुनील गणाचार्य यांनी दिली.

भत्यांमध्ये वाढ
वैद्यकीय भत्ता २० हजारांवरून ३० हजार रुपये, भोजन भत्ता १८ रुपयांवरून ५० रुपये, रजा प्रवास भत्ता दुप्पट, किमान मूळ वेतन ११ हजार १००, तसेच २३ हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रजा प्रवास भत्त्यात ३ हजार रुपये, तसेच ११ हजार रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. २०टक्के घरभाडे भत्ता २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. आता नव्याने कार्यालयीन भत्ता मिळणार असून पदाच्या श्रेणीनुसार अडीचशे ते एक हजार रुपये दूरध्वनी भत्ता देण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment