मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई चेंबूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या नुतनिकरणा प्रसंगी उद्यानासमोर अशोक स्तंभ उभारण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी निधीची तरतूद सुधा करणायत आली होती. परंतु अशोक स्तंभ हे राष्ट्रीय प्रतिक असल्याने त्याचा वापर कुठेही करता येणार नाही असे सांगत केंद्र सरकारने अशोक स्तंभ उभारण्यास बंदी घातली होती.
आंबेडकर उद्याना समोर ६ डिसेंबर व १४ एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे अर्धवट अशोक स्तंभ उभारून ठेवण्यात आला आहे. हा अशोक स्तंभाचा अपमान असल्याने या अशोक स्तंभाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणी साठी संविधान साक्षरता मिशन या संस्थेच्या वतीने अड्वोकेट सांझकर यांच्या पत्नी नूतन सांझकर यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
यावेळी स्थानिक खासदार एकनाथ गायकवाड, आमदार चंद्रकात हंडोरे, यांनी भेट देवून याबाबत हिवाळी अधिवेशनात लोकसभेत व विधानसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी मिळवून या ठिकाणी अर्धवट असलेला अशोक स्तंभ पूर्ण करून घेतले जाईल असे आश्वासन दिले. तसेच रामदास आठवले यांनी उपोषणं ठिकाणी भेट देवून अशोक स्तंभ त्वरित उभारला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तर पीपल्स रिपब्लिकनचे जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिले आहे.यामुळे सांझकर यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेतले आहे.......


No comments:
Post a Comment