आठवलेंकडून शिवसेनेची प्रवक्तेगिरी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठवलेंकडून शिवसेनेची प्रवक्तेगिरी

Share This
मनसे महायुतीत आल्यास रिपाइचे अस्तित्व धोक्यात 
मुंबई / अजेयकुमार जाधव 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी शिवसेनेत यायची तयारी दर्शवल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू असे मत व्यक्त केले असतानाच रिपाइ (आठवले ) गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही राज ठाकरे यांनी मनसे पक्ष विसर्जित करून शिवसेनेमध्ये प्रवेश करावा अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सदर पत्रकार परिषदे मध्ये बोलताना मनसे महायुतीमध्ये आल्यास आठवलेंच्या वाट्याला जागा मिळण्याबाबत प्रश्न उभा राहणार असल्याने आठवले यांनी जागा वाटपाची अडचण निर्माण होऊन रिपाइ चे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती आठवले यांनी व्यक्त केली. यावेळी मनसे महायुतीमध्ये आल्यास रिपाइला आपला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देतानाच मनसे महायुतीमध्ये येणार असल्यास त्यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेवू असे आठवले यांनी सांगितले. सध्या सेना भाजपा व रिपाइ यांची महायुती काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला सशक्त असा राजकीय पर्याय असून मनसेची महायुतीला आवश्यकता नसल्याचे आठवले यांनी सांगितले. 

दरम्यान गेले काही दिवस शिवसेना किवा उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका हीच रिपाइची भूमिका होत असल्याने रिपाइ शिवसेनेची प्रवक्तेगिरी करते का, रिपाइ आठवले गटाचे शिवसेनेत विलीनीकरण करणार का असे प्रश्न विचारल्यावर मी शिवसेनेची प्रवक्तेगिरी करत नसून रिपाइ शिवसेनेत विलीन करणार नसल्याचे आठवले यांनी सांगून वेळ मारून नेली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages