मुंबई : आजारपण व अपंगत्वामुळे अनेक बेस्ट वाहकांना पर्यायी हलके काम मिळावे म्हणून बेस्टने आता एक खिडकी योजना राबवण्याचे ठरवले आहे. पूर्वी सहा-सात विभागांत चकरा मारून असे कर्मचारी वैतागून जायचे. बेस्टच्या या निर्णयाने आता एकाच खिडकीत सर्व सोपस्कार पूर्ण करून पर्यायाची कामे मिळवता येणार आहे. बेस्टचे वैद्यकीय अधिकारी, वडाळय़ाचे नियोजन केंद्र, कर्मचारी नियंत्रण विभाग आदी विभागात चकरा मारून हे आजारी कर्मचारी वैतागून जायचे. येत्या सोमवारी महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांच्या उपस्थित होणार्या बैठकीत या एक खिडकी योजनेबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ४५० कामगारांना पर्यायी काम देण्याचे ठरवले आहे.
Post Top Ad
14 February 2013
Home
Unlabelled
बेस्ट कामगारांना आता एक खिडकी योजना
बेस्ट कामगारांना आता एक खिडकी योजना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment