महिलांवर अत्याचार करणारांवर बहिष्कार घाला, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. असे प्रकार रोखण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता असून, विविध स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
दलितांवरील वाढत्या अत्याचाराला मराठा व सवर्ण समाज जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी असे विवाह करणाऱ्यांना दोन लाख रुपये मानधन व एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
इंदापूर येथील चंद्रकांत गायकवाड हत्येची सीआयडी चौकशी व्हावी, त्याच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. रिपाइंतर्फे गायकवाड कुटुंबीयांना एक लाखाची मदत देण्यात येईल, असे त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी पीस पार्टीच्या काही पदाधिकार्यांनी रिपाइंत प्रवेश केला. मुस्लीम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रिपाइंशिवाय पर्याय नाही, असे पीस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मन्सूर बलोच यांनी या वेळी सांगितले.
Post Top Ad
16 February 2013
Home
Unlabelled
गायकवाड हत्येची सीआयडी चौकशी करा - आठवले
गायकवाड हत्येची सीआयडी चौकशी करा - आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment